नांदेड जिल्ह्यात 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 14 :- शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 233 अहवालापैकी 1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 624 एवढी झाली असून यातील 18 हजार 660 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 249 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील येवती येथील 23 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 539 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 27 हजार 264निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 4 हजार 167एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 624एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 660एकूण मृत्यू संख्या- 539उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंकआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 21आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 356रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 249आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 15.

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.