जालना जिल्ह्यात 33 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

51 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 13:- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 51 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर चाचणीद्वारे एकुण 32 व अँटीजेन चाचणीद्वारे 01 अशा एकुण 33 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-17595 असुन सध्या रुग्णालयात-164 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6065 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-1449 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-78842 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-33 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-11582 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-64119 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2014, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5136

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5607 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-5, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 38 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-164, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-43, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-51 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-10793, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-487 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-177698 मृतांची संख्या-302