नांदेड जिल्ह्यात 28 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 13 :- शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 514 अहवालापैकी 1 हजार 469 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 595 एवढी झाली असून यातील 18 हजार 626 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 255 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार तीन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन मोंढा नांदेड येथील 51 वर्षाच्या पुरुषाचा, लोहा तालुक्यातील गुंडेवाडी येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020 रोजी हदगाव तालुक्यातील वायफना येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 538 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 26 हजार 548निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 3 हजार 501एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 595एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 626एकूण मृत्यू संख्या- 538उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 354रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 255आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 16.

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.