कोरोनाबाबत महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई, दि. ११: देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्याने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी कौतुक केले.

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.

कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहीम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले.  ते अन्य राज्यांसाठीही उपयुक्त ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावे 

राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी  सांगितले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत कोरोनाविषयक तपासणी व जनजागृती करता आल्याने त्याचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिली.

दिवाळी सण, हिवाळा या पार्श्वभूमीवर राज्य शासन घेत असलेल्या खबरदारीविषयी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील ॲक्टिव्ह केसेस कमी झाल्या आहेत. सध्या ९२ हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालय स्तरावर इन्स्टिट्यूशनल डेथ ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय लवकर निदान लवकर उपचारावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड विषयक नियमांचे पालन हीच आज सर्वात मोठी सामाजिक लसडॉ हर्षवर्धन

नवी दिल्ली,  11 नोव्हेंबर 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज सात राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिवांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि कोविड स्थितीचा आढावा घेतला. यात महाराष्ट्र, उत्तराखंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि गोवा या राज्यांचा समावेश होता.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री टी एस रावत, मणिपुरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह, महाराष्ट्राचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे, मिझोरमचे आरोग्यमंत्री डॉ लालथिंगलियाना, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, त्रिपुराचे शिक्षणमंत्री रतनलाल नाथ या बैठकीत सहभागी झाले होते.

याआधीही डॉ हर्षवर्धन यांनी विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधत, कोविड स्थितीचा आढावा घेतला होता.

राज्यांशी संबंधित असे मुद्दे ज्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे., त्यावर भर देत डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की महाराष्ट्रातील रुग्णसंख्या जरी कमी झाली असली, तरी, आजही  राज्याचा मृत्यूदर अधिक म्हणजे 2.6%  (मुंबई आणि आसपासच्या भागात 3.5% ) इतका असल्याने उपचाराखालील  रुग्णांचा भार अधिक आहे. उत्तराखंड येथेही मृत्यूदर सरासरी दरापेक्षा अधिक म्हणजे 1.64% इतका आहे. मणिपूर येथे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढते आहे. रुग्ण वाढत जाणे हे छुपे संक्रमण होत असल्याचे निदर्शक आहे. गोव्यात गेल्या एका महिन्यात एकूण मृत्युंपैकी 40 टक्के मृत्यूंची नोंद झाली असून या चिंतेचा विषय आहे. मिझोराममधील 70 टक्के रुग्ण ऐझवाल येथील असून, रुग्णसंख्या वाढते आहे. त्रिपुरा आणि मेघालयात अंदाजे 37 टक्के कोविड मृत्यू, 40 ते 60 वायोगटातील रुग्णांचे झाले आहेत.

गेले अनेक महिने न थकता, अविरतपणे कोविडशी आघाडीवर राहून समर्थ आणि निश्चयी लढा देणाऱ्या सर्व कोरोनायोद्ध्यांचे त्यांनी कौतुक केले. आज देशात, 4.09% सक्रीय रुग्ण ऑक्सिजन सपोर्ट वर आहेत, 2.73% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत आणि केवळ 0.45% रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी हिवाळा आणि उत्सवाचा काळ बघता कोविडचे संक्रमण होऊ नये यासाठी आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, यावर त्यांनी वारंवार भर दिला.

संक्रमण साखळी तोडण्यासाठी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या जन-आंदोलन चळवळीचे महत्व त्यांनी विशद केले. पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, कोविड पासून बचाव करण्यासाठीचे नियम आणि सवयींचे पालन करण्याचे आवाहन केले, त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत , जनआंदोलनातून कोविडला निष्प्रभ करणारी एकत्रित उर्जा निर्माण करायला हवी असे ते म्हणाले. ही जनचळवळ व्यापक करण्यासाठी सरकारने केलेल्या उपायांची त्यांनी माहिती दिली. कोविड विषयक नियमांचे पालन हीच आज कोविड विरोधी सर्वात प्रभावी सामाजिक लस आहे, असे डॉ हर्षवर्धन म्हणाले.

राज्यांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, विशेषतः ज्या भागात रुग्ण अधिक आहेत अशा जिल्ह्यात व्यापक चाचण्या केल्या जाव्यात, लक्षणे असलेल्या मात्र निगेटिव्ह असलेल्यांची अनिवार्य रॅपिड अँटीजन टेस्ट करावी, कोविडचा धोका अधिक असलेल्या रूग्णांवर भर द्यावा, सर्वेक्षण केले जावे, ज्यातून संक्रमणाची माहिती मिळेल, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा माग घ्यावा, गृह विलगीकरणात असलेल्या असलेल्या लोकांचे निरीक्षण, गरज पडल्यास त्वरित उपचारांची सुविधा, या सर्व प्रयत्नांमुळे राज्यांमधील मृत्यूदर कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. बाजार, गर्दीच्या जागा, अशा ठिकाणी चाचण्यांची संख्या वाढवली जावी, अशीही सूचना त्यांनी केली.

यावेळी विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात कोविड प्रतिबंधन, निरीक्षण आणि उपचार याबाबतीत काय काय उपाययोजना केल्या याची माहिती दिली. महाराष्ट्रात सुरु असलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. या मोहिमेअंतर्गत, घरोघरी जाऊन, लोकांचे निरीक्षण आणि सर्वेक्षण केले जाते तसेच सारी/आयएलआय च्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते, असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 5.7 लाख रूग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि 51,000 हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध लागला आहे, असेही टोपे म्हणाले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांन तीन भागांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. यात, संक्रमण साखळी तोडणे, मृत्यूदर 1 टक्क्यापेक्षा कमी राखणे आणि कोविड संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी, मानसिकतेत आणि सवयींमध्ये दीर्घकालीन बदल यांचा समावेश आहे. हे साध्य करण्यासाठी, जलद आणि आक्रमक चाचण्या, गर्दीच्या ठिकाणी चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा त्वरित माग घेणे, किमान दहा लोकांचा मागोवा घेणे, आरटी पीसीआर चाचण्यांवर भर देणे, असे उपाय त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी कोविड बाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी आरोग्य मंत्रालयाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज सात राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिवांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि कोविड स्थितीचा आढावा घेतला. यात महाराष्ट्र, उत्तराखंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि गोवा या राज्यांचा समावेश होता.