औरंगाबाद पदवीधर निवडणूक-1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत — जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल रेखावार

बीड,दि. 09 :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 ची घोषणा दि. 02 नोव्हेंबर 2020 रोजी केली आहे. त्यानुसार दि. 01 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मतदान होणार आहे. या दिवशी जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 हे जिल्हा मुख्यालयातच, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, बीड येथे पदवीधर मतदार संघाचे निवडणूक विषयक कामासाठी उपस्थित असतील असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.