औरंगाबाद जिल्ह्यात 61 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,चार मृत्यू

जिल्ह्यात 39356 कोरोनामुक्त, 677 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 09 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 75 जणांना (मनपा 53, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39356 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 61 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41140 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1107 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 677 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (52) घाटी परिसर (1), एन-8 सिडको (1), कांचनवाडी (1), जय नगर उस्मानपुरा (1), एन-13, भारत नगर (1), लोकशाही कॉलनी एन-4 (1), निराला बाजार (1), समर्थ नगर (1), केळी बाजार (1), खडकेश्वर (1), राजनगर (1), बीडबायपास परिसर (2), घाटी परिसर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सिडको, एन सहा (1), नाईक नगर (1), न्यू शांतीनगर कॉलनी (1), अन्य (34)

ग्रामीण (09) शेलगाव, गंगापूर (1), गंगापूर (1), नारायणगाव (1), बजाज नगर (1), वाकला, वैजापूर (1), सायगव्हाण, गंगापूर (1), अन्य (3)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गारखेडा परिसरातील 65 वर्षीय पुरूष, एन दोन सिडकोतील 60 वर्षीय पुरूष, एकता कॉलनीतील 72 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात भक्ती नगर, पिसादेवी रोड येथील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.