औरंगाबाद जिल्ह्यात 108 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 39040 कोरोनामुक्त, 708 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 05 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 50 जणांना (मनपा 28, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39040 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 108 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40847 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1099 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 708 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (79) हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (1), एन-दोन सिडको (1), अयोध्या नगर (2), पडेगाव (1), जाधववाडी (1), राजनगर, हर्सूल (1),कुटुर हाऊसिंग सोसायटी (1), टी. व्ही. सेंटर (1), मुकुंदवाडी पोलीस स्टेशन (1),साईनगर, सातारा परिसर (1), बीड बायपास (1), फुलेनगर, हर्सूल (1), घाटी परीसर (1), हनुमान नगर (1), एन तीन कामगार चौक (1), एन एक सिडको (1), अन्य (62)

ग्रामीण (29) बजाज नगर (1), रांजणगाव, बजाज नगर (1), लासूर स्टेशन, गंगापूर (2), मनूर, वैजापूर (4), वाळूज (1), वाळूज महानगर (1), शिक्षक कॉलनी, वैजापूर (1), उपजिल्हा रुग्णालय परिसर, वैजापूर (2), अन्य (16)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील 80 वर्षीय पुरूष, सातारा परिसरातील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.