औरंगाबाद जिल्ह्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,सात मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 80 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 30 आणि ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (24) बिरोळा, वैजापूर (1), ए.एस. क्लब (1), सिडको वाळूज महानगर एक (1), वास्तू विहार, सिडको महानगर एक (2), बजाज नगर, वडगाव (1), वानेगाव, फुलंब्री (2), मनूर, वैजापूर (1), जांभरगाव (1), जैन कॉलनी (2), गाढेजळगाव (1), भिवधानोरा गंगापूर (1), महालकिन्होळा (1), औरंगाबाद (2), गंगापूर (2), वैजापूर (4), पैठण (1),

मनपा (26) घाटी परिसर (1), संग्राम नगर, बीड बायपास (1), फिरदोस गार्डन, पडेगाव (1), उस्मानपुरा (1), खिवंसरा हॉटेल परिसर, आकाशवाणी (1), जालन नगर (1), अन्य (6), गुरू सहानी नगर, एन चार (1), म्हाडा कॉलनी, उस्मानपुरा (1), एन पाच, श्री नगर (1), हुसेन कॉलनी (1), एन सहा सिडको (1), जय भवानी नगर (1), पद्मपुरा (1), सुराणा नगर (2), मौलाना आझाद संशोधन केंद्र परिसर (1), पहाडसिंगपुरा (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (2)

सात कोरोनाबाधिताचा मृत्यू घाटीत जाफर गेट येथील 76 वर्षीय पुरूष, वडोद खुलताबाद येथील 65 वर्षीय पुरूष, सिद्धनाथ वडगाव येथील 78 वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील 68 वर्षीय पुरूष, फुलंब्रीतील 74 वर्षीय पुरूष, पृथ्वी पार्क, पडेगाव येथील 65 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात पवन नगर हडकोतील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.