नांदेड जिल्ह्यात 43 कोरोना बाधितांची भर ,52 बाधितांना सुट्टी

नांदेड दि. 4 :- बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 52 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 297 अहवालापैकी 1 हजार 197 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 286 एवढी झाली असून यातील 18 हजार 140 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 464 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.आज रोजी आतापर्यंत प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 518 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 17 हजार 319निगेटिव्ह स्वॅब- 94 हजार 543एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 286एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 140एकूण मृत्यू संख्या- 518उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.50 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 467रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 464आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.