भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या आज 5.5 लाखांच्या खाली घसरली

105 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णांची संख्या 38,310 नोंदली गेली

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 70 लाखांनी अधिक

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020

कोविड विरुद्ध लढ्यात भारताने अनेक महत्वपूर्ण मैलाचे दगड पार केले आहेत. गेल्या २४ तासात ४० हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. 15 आठवड्यानंतर (105 दिवस) एका दिवसातील रुग्णांची संख्या 38310 इतकी नोंदली गेली. 22 जुलै 2020 रोजी 37,724 नवे रुग्ण आढळले होते.

दररोज मोठ्या संख्येने कोविड रूग्ण बरे होत आहेत आणि मृत्यु दरात सातत्याने घसरण होत आहे, त्यामुळे भारताची सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

भारताने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून  सक्रिय रुग्णांची संख्या 5.5 लाखांच्या खाली घसरली आहे.  देशातील उपचार सुरु असलेल्या एकूण  रुग्णांची संख्या  5,41,405 आहे आणि आता ती एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 6.55% आहे.

WhatsApp Image 2020-11-03 at 10.03.23 AM.jpeg

हे उत्साह वाढवणारे निष्कर्ष व्यापक आणि सातत्याने देशभरात मोठ्या संख्येने चाचण्या, त्वरित आणि प्रभावी देखरेख, शोध, त्वरित उपचार आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलचा प्रभावी अवलंब करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाअंतर्गत  राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्यात्मक, केंद्रित आणि प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम आहेत. तसेच देशाच्या सर्व भागांमधील डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी, आघाडीवरचे कामगार आणि इतर सर्व कोविड  योद्ध्यांची निःस्वार्थ सेवा आणि समर्पण यामुळे हे यश शक्य झाले आहे.

बरे झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने 76 लाख (76,03,121) चा टप्पा ओलांडला आहे.

सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर आज 70  लाखांच्या पुढे गेले असून ते  70,61,716  इतके आहे.

WhatsApp Image 2020-11-03 at 9.59.46 AM.jpeg

गेल्या 24 तासात देशभरात 58,323 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दरही वाढून 91.96%.झाला आहे. 

बरे झालेल्या रुग्णांपैकी 80%10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

एका दिवसात 10,000 हून अधिक रुग्ण बरे झालेल्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ  कर्नाटकमध्ये  8,000,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

WhatsApp Image 2020-11-03 at 9.59.53 AM (2).jpeg

नवीन रुग्ण संख्येपैकी 74% 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळ, दिल्ली आणि महाराष्ट्रात 4,000  पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 3,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत.

WhatsApp Image 2020-11-03 at 9.59.53 AM.jpeg

गेल्या 24 तासांत 490 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी जवळपास 80% प्रामुख्याने दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू (104 मृत्यू) झाले आहेत.भारताचा मृत्यू दर 1.49%. आहे.