औरंगाबाद जिल्ह्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू

जिल्ह्यात 37261 कोरोनामुक्त

औरंगाबाद, दिनांक 03 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 324 जणांना (मनपा 283, ग्रामीण 41) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 37261 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज एकूण 54 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38336 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1078 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 30 आणि ग्रामीण भागात 06 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (17) गंगापूर (5), कासोद सिल्लोड (1), बजाज नगर (2), फुलंब्री (1), वीरगाव वैजापूर (1), उक्कडगाव वैजापूर (1), फुलेवाडी रोड वैजापूर (1), वैजापूर (1), श्रीकृष्ण नगर नगरी देवळाई (1).औरंगाबाद (1), सिल्लोड (1), पिंपळगाव (1)

मनपा (07) निरंजन हौ.सो.टिळक नगर(1), एन 9 श्री कृष्णा नगर सिडको (1), एन 2 सिडको (1), एन 9 शिवाजी नगर (1), जाधववाडी(1), बजाज हॉस्पीटल परिसर (1), गुलमंडी (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत खुलताबाद येथील 43 वर्षीय पुरूष, मिसारवाडीतील 54 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात बालाजी नगरातील 58 वर्षीय स्त्री, वानखेडे नगरातील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.