नांदेड जिल्ह्यात 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

59 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 2 :- सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 59 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले.

आजच्या एकुण 468 अहवालापैकी 434 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 203 एवढी झाली असून यातील 18 हजार 38 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 494 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 31 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी रामनगर हदगाव येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 515 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 13, हिंगोली 1, किनवट तालुक्यात 1 असे एकुण 15 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, परभणी 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकूण 14 बाधित आढळले.जिल्ह्यात 494 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 15 हजार 367निगेटिव्ह स्वॅब- 92 हजार 378एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 203एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 38एकूण मृत्यू संख्या- 515उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंकआज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 414रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 494आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 31.