रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 48.19 % वर पोहोचले.

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

गेल्या 24 तासात 4,835 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 91,818 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असून ते आता 48.19 % वर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 18 मे रोजी 38.29 % होते. 3 मे रोजी 26.59 % तर 15 एप्रिल रोजी 11.42 % होते.

आजमितीस सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली 93,322 रुग्ण आहेत. मृत्यू दर 2.83% आहे. 18 मे रोजी मृत्यू दर 3.15% तर 3 मे रोजी 3.25 % होता तर 15 एप्रिल रोजी 3.30 % होता. देशात मृत्यू दर सातत्याने कमी होताना दिसत आहे. सातत्याने सर्वेक्षणावर भर, वेळेवर निदान करणे आणि रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे तुलनेने मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.

अशा प्रकारे दोन विशिष्ट बदल लक्षात घेतले जात आहेत, एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे मृत्यू दर कमी होत आहे.

472 शासकीय आणि 204 खाजगी प्रयोगशाळांद्वारे (एकूण 676 प्रयोगशाळांद्वारे) चाचणी क्षमता वाढली आहे. यात एकत्रितपणे कोविड -19 साठी आतापर्यंत एकूण, 38,37,207 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, तर काल 1,00,180 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या परिस्थितीजन्य अहवाल-132 नुसार दिनांक 31 मे रोजी मृत्यूची संख्या सर्वाधिक असलेल्या देशातील मृत्यूचे प्रमाण खालीलप्रमाणे आहेः

देशएकूण मृत्यूमृत्यू दर
जग367,1666.19%
अमेरिका1,01,5675.92%
युनायटेड किंगडम38,37614.07%
इटली33,34014.33%
स्पेन29,04312.12%
फ्रांस28,71719.35%
ब्राझील27,8785.99%
बेल्जीयम9,45316.25%
मेक्सिको9,41511.13%
जर्मनी8,5004.68%
इराण7,7345.19%
कॅनडा6,9967.80%
नेदरलँड्स5,95112.87%

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न [email protected] यावर तर इतर प्रश्न [email protected] and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *