औरंगाबाद जिल्ह्यात 127 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,एकाचा मृत्यू

जिल्ह्यात 36424 कोरोनामुक्त, 549 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 195 जणांना (मनपा 87, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36424 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 127 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38043 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1070 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 549 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 39 आणि ग्रामीण भागात सहा रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (50) अंबिका नगर (1), माया नगर (1), हर्ष नगर (1), छत्रपती नगर (1), गुलमंडी (1), ज्योती नगर (2), एन आठ सिडको (4), जालान नगर (4), कांचनवाडी (3), एमआयडीसी कॉलनी (1), एसबीएच कॉलनी (2), शिवाजी नगर (1), मातोश्री नगर (2), पुंडलिक नगर (1), मयूर पार्क (2), पिसादेवी रोड (1), बीड बायपास (2) श्रीकृष्ण नगर (1), शांतीपेठ कॉलनी (1), एन चार, सिडको (3), शिवाजी नगर (1), एन तीन सिडको (1), समर्थ नगर (2), एन एक सिडको (1), बन्सीलाल नगर (1), संजय नगर (1), विशाल नगर (1), मनिषा नगर (1), विष्णू नगर (1), नागेश्वरवाडी (1), मनिषा कॉलनी (1), घाटी परिसर (1), एन नऊ, सिडको (1), अन्य (1)

ग्रामीण (38) भेंडाळा (1), अज्वा नगर, वाळूज (1), यशवंत नगर, पैठण (2), हनुमंतगाव, गंगापूर (1), मांजरी, गंगापूर (2), गंगापूर (1), शहापूर, गंगापूर (2), रोटेगाव (3), भागाव (1), जळगाव, पैठण (3), भडजी,खुलताबाद (3), वाहेगाव (2), अडगाव, कन्नड (1), बजाज नगर (3), श्रेय नगर (2), वळदगाव (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), अन्य (1), खोडेगाव (1), वैजापूर (4), पैठण (2)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यूशहरातील एका खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.