औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या दक्षता पेट्रोल पंपाचे उद्घाटन

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद, दि.29 :- औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीसांद्वारे चिकलठाणा येथे उभारण्यात आलेल्या दक्षता पेट्रोलपंपाचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झाले.

            मंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते सुरवातीला कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, आमदार उदयसिंह राजपूत, चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्न, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता,मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

            प्रारंभी पोलीस बँण्ड पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण जिल्हा पोलिसांद्वारे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या माहितीपुस्तिकेचे विमोचन श्री.देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलिसांद्वारे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर स्त्री-पुरूष समानता राखण्यात यावी याबाबतची पोलीस विभागातर्फे निर्मित करण्यात आलेली ‘अभिन्न’ चित्रफित यावेळी मान्यवरांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपअधीक्षक विशाल नेहूल यांनी केले.