औरंगाबाद जिल्ह्यात 119 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,तीन मृत्यू

जिल्ह्यात 35893 कोरोनामुक्त, 824 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 265 जणांना (मनपा 189, ग्रामीण 76) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 35893 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 119 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37783 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1066 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 824 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 38 आणि ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (42) श्रीराम नगर (1), हर्सूल (1), रेवा रेसिडेन्सी, उस्मानपुरा (1), नंदनवन कॉलनी, (1), पन्नालाल नगर (1), अन्य (2), एन 5 सिडको (1), होनाजी नगर (1), टि व्हि सेंटर (1), विष्णूनगर (1), म्हाडा कॉलनी, एन- 2 सिडको (1), जहागिर कॉलनी (6), नक्षत्रवाडी (2), अक्षय पार्क सिडको 1 (1), अक्षय पार्क एन 9 सिडको (1), सौभाग्य चौक, एन अकरा (1), गव्हमेंट कॉर्टर, स्नेहनगर (1), वर्धमान बँक परिसर (1), उत्तरा नगरी (1), व्यंकटेश नगर, पिसादेवी (1), दत्त विहार , पिसादेवी रोड परिसर (1), मयुर पार्क (1), सदाशिव नगर (1), लेबर कॉलनी कलेक्टर ऑफिस परिसर (1),

ग्रामीण (39) पैठण (4), तांलपिंप्री, गंगापूर (1), हांडेगाव, गंगापूर (1), खुलताबाद (1), सिडको महानगर तिसगाव (3), सावरकर चौक , बजाजनगर (1), टोकी गंगापूर (1), भांजी मंडी, पंढरपूर (2), पोलीस स्टेशन परिसर (5), बालाजी नगर ,कमलापूर (2), जैतपूर कन्नड (1), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (1),भेंडाळा, गंगापूर (1), औरंगाबाद (1), फुलंब्री (4), गंगापूर (3), खुलताबाद (5), वायाळवस्ती, सिरसगाव (1), जोगेश्वरी (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत हिमायत बाग परिसरातील 54 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात होनाजी नगरातील 58 वर्षीय पुरूष, जालान नगरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.