जालना जिल्ह्यात 34 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

141 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.27 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 141 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 33 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 34 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16492 असुन सध्या रुग्णालयात-169 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5780 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-757 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-66776 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10476 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55233 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-740, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4870

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5291 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-54, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-154 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-169, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-17, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-141, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9117, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1086 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-164321 मृतांची संख्या-273

जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 373 नागरिकांकडून 40 हजार 50 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 856 नागरीकांकडुन 13 लाख 28 हजार 894 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.