परभणी जिल्ह्यात 195 रुग्णांवर उपचार सुरू, 23 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 27 :- जिल्ह्यातील 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 428 एवढी झाली आहे. त्यापैकी 5 हजार 971 बरे झाले तर 262 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 195 जणांवर उपचार सुरु आहेत. सोमवार दि.26 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 17 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 688 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 195 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 493 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.