औरंगाबाद जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 35474 कोरोनामुक्त, 1033 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 104 जणांना (मनपा 22, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 35474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37565 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1058 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 42 आणि ग्रामीण भागात 08 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (26) बायजीपुरा (1), मुकुंदवाडी (1), काल्डा कॉर्नर (1), वेदांत नगर (1), मिटमिटा (1), एन एक सिडको (1), देवळाई परिसर, सातारा (1), शिवाजी नगर (1), सह्याद्री हिल्स (1), केशव नगरी (1), प्रोझोन मॉल जवळ (1), पडेगाव (2), घाटी परिसर (2), चेतना नगर (1), नक्षत्रवाडी (2), सावंगी, हर्सुल (1), चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), मिलिट्री हॉस्पिटल (1), जहांगीर कॉलनी (1), मुकुंदवाडी (2), जवाहर कॉलनी (1)

ग्रामीण (16) सिद्धनाथ वडगाव (1), गंगापूर (4), शहापूर, गंगापूर (2), लासूर (1), देवपूळ, कन्नड (1), फुलंब्री (1), कन्नड (2), पैठण (1), सिल्लोड (3)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एन नऊ येथील 67 वर्षीय स्त्री, पडेगावातील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात सिल्क मिल कॉलनीतील 61 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.