परभणी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरु ठेवण्यास परवानगी

परभणी, दि. 26 :- शासनाच्या ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत सुट दिलेल्या बाबींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील जिल्ह्यातील जीवनावश्यक बाबी, आस्थापना व व्यापारीक आस्थापना सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधिन राहून जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दि.26 ऑक्टोबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत. वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील. ज्या आस्थापना, दुकानांना सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नाही त्या बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.