नांदेड जिल्ह्यात 76 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

189 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 24 :- शनिवार 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 189 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 36 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 40 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 466 अहवालापैकी 1 हजार 370 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 652 एवढी झाली असून यातील 17 हजार 95 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 929 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.

या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 23 ऑक्टोंबर रोजी सिडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 499 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 5 हजार 131निगेटिव्ह स्वॅब- 83 हजार 187एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 652एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 95एकूण मृत्यू संख्या- 499उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 386 रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 929

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.