रांगोळी, चित्रकला स्पर्धेतून कोरोना योद्ध्यांना जालन्याच्या विद्यार्थ्यांचे  अभिवादन

जालना  :ऑनलाइन रांगोळी, चित्रकला स्पर्धेतून कोरोना योद्ध्यांना जालन्यातील  संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले आहे.  कोरोना टाळेबंदीत ’वर्क फ्रॉम होम’ यातून ज्ञानार्जना बरोबरच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे छंद जोपासावेत याच हेतूने ऑनलाईन रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर), परिचारिका (नर्स), कर्तव्यदक्ष पोलीस दादा या विषयावर रांगोळी, चित्र काढण्याचे सांगण्यात आले होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कोरोना महासंकटात योध्या सारखे कार्य करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, पोलीस दादा यांना रांगोळी आणि चित्राद्वारे अभिवादन करण्यात आले. ऑनलाइन अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचे विविध छंद जोपासण्याचे कार्य सुरू आहे. 

रांगोळी स्पर्धेत प्रथम पायल अंबेकर, द्वितीय तनवी भालेराव, तृतीय प्रांजल रांजणकर तर चित्रकला स्पर्धेत प्रथम सुवर्णा पाडळे, द्वितीय आदर्श जटाळे, तृतीय आकांक्षा पवार या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळविला आहे.  स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक संतोष जोशी, अरविंद देशपांडे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन  रामदास कुलकर्णी यांनी केले 

सुट्टीत अभ्यासाबरोबर छंद जोपासायला मिळतो याचा आनंद होतो. छंदामुळे अभ्यासाचा कंटाळा येत नाही.- प्रतिक्षा यादव 

ऑनलाइन रांगोळी स्पर्धा आयोजित केल्याने आनंद वाटला. यामुळे अभ्यास करण्याला उत्साह प्राप्त झाला.- सुवर्णा पाडळे

Leave a Reply

Your email address will not be published.