जालना जिल्ह्यात 96 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.20 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 52 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 89 तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 असे एकुण 96 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16157 असुन सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5637 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-387 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-63494 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-279, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-96 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10012 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-52750, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-404, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4791

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5138 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-52, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-186 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-30, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7905, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1844 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-152744 मृतांची संख्या-263.

जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 15नागरिकांकडून 2 हजार 300 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 350 नागरीकांकडुन 12 लाख 67 हजार 644 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.