औरंगाबाद जिल्ह्यात 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,सहा मृत्यू

जिल्ह्यात 33594 कोरोनामुक्त, 1948 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18: औरंगाबाद जिल्ह्यात आज 243 जणांना (मनपा 121, ग्रामीण 122) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 33594 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36576 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1034 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 27 आणि ग्रामीण भागात 05 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (40)घाटी परिसर (1), अन्य (1), श्रेय नगर (2), शिवाजी नगर (1), इटखेडा (1), यशोदा हॉस्पीटल परिसर (1), पारिजात नगर (1), साई परिसर (2), उल्कानगरी (2), शांती नर्सिंग होम परिसर (1), वर्धमान रेसिडन्सी (1), पोलिस कॉलनी, चिकलठाणा (1), हरिओम नगर, जटवाडा रोड (1), सूतगिरणी चौक परिसर (1), सारा वैभव, जटवाडा रोड (1),श्रीविहार कॉलनी, देवळाई रोड (1), विजयंत नगर, देवळाई परिसर (1), एन सहा सिंहगड कॉलनी (1), मेहेर कॉलनी (1), निसर्ग कॉलनी (1), अविष्कार कॉलनी, एन सहा (1), जाधववाडी (3) दिवाणदेवडी (2), श्रीनगर, गारखेडा (1), निराला बाजार (1), विष्णू नगर (1), उत्तरानगरी, धूत हॉस्पीटल (1), रामगोपाल नगर, पडेगाव (2), सुपारी हनुमान रोड (1), एन सहा सिडको (1), ज्योती नगर, उस्मानपुरा (1), खडकेश्वर (1), मयूर पार्क (1),

ग्रामीण (53) वाळूज एमआयडीसी परिसर (2), बाबरा, फुलंब्री (1), लखमापूर, गंगापूर (2), भेंडाळा, गंगापूर (1), कलावती बोर्डिंग परिसर, बजाज नगर (1), साई श्रद्धा अपार्टमेंट, बजाज नगर (1), मातरगाव, गदाना (3), गणोरी, फुलंब्री (3), गिरीजा नगर, फुलंब्री (1), सावता मंदिर, फुलंब्री (1), सहारा कॉलनी, फुलंब्री (1), साठे नगर, वाळूज (2),शांती नगर, रांजणगाव (2), बकवाल नगर (1), पोलिस स्टेशन, वाळूज (1), म्हाडा कॉलनी, तिसगाव (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (2), धनगर गल्ली, खोडेगाव (3), श्रीराम कॉलनी, कन्नड (3), चाळीसगाव रोड, वाटर टँकजवळ, कन्नड (1), समर्थ नगर, कन्नड (3), लासूर स्टेशन (2), गोपालवाडी, गंगापूर (1), वाडी, गंगापूर (1), गंगापूर (5), नेवरगाव, गंगापूर (1),भवन सिल्लोड (1), शेलगाव, कन्नड (1), वडगाव को. (3), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), पैठण (1)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत वैजापुरातील 74 वर्षीय स्त्री, पैठण येथील 65 वर्षीय स्त्री, चिंचोलीतील 48 वर्षीय पुरूष, शहरातील श्रीकृष्ण नगरातील 82 वर्षीय् पुरूष, मुकुंदवाडीतील 55 वर्षीय पुरूष, शेकटा येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.