नांदेड जिल्ह्यात 92 बाधितांची भर तर तिघांजणांचा मृत्यू

121 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 18 :- रविवार 18 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 121 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 92 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 45 बाधित आले.

आजच्या एकुण 766 अहवालापैकी 657 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 79 एवढी झाली असून यातील 15 हजार 918 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 565 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी खाजगी रुग्णालयात सिडको येथील 55 वर्षाची एक महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नरसी नायगाव येथील 67 वर्षाचा एक पुरुष, आणि हदगाव घोगरी येथील 37 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 483 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 99 हजार 211निगेटिव्ह स्वॅब- 77 हजार 887एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 79एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 918एकूण मृत्यू संख्या- 483उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.4आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 409 रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 565आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 44

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.