कर्णपुरा देवी नवरात्र उत्सव  उत्साहात प्रारंभ

औरंगाबाद:शहरातील ग्रामदैवत कर्णपुरा येथील नवरात्र उत्सवला आजपासून सुरुवात झाली असून आजच्या प्रथम दिनी तुळजाभवानी मातेची या यात्रेचे संस्थापक अध्यक्ष  शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते विधीवत पूजा, आरती आणि घट स्थापना करून परंपरागत नवरात्र उत्सवाला  उत्साहात प्रारंभ झाला. प्रशासकीय सूचनांचे पालन करत  मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत काळजी घेत  उत्सवाची  सुरुवात झाली. 

नवरात्रोत्सवात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कर्णपुरा येथे दरवर्षी  खूप मोठ्या  प्रमाणात यात्रा  भरत असते या काळात लाखो भाविक  तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात  परंतु  यावर्षी कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर यंदा कर्णपुरा येथे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यंदा भाविकांसाठी  दर्शन बंद आहे. म्हणून भाविक नाराज आहेत मात्र, भावनेपेक्षा कोरोना विषाणू वर मात करणे, आपला जीव आणि आरोग्य महत्वाचं असल्याचं आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले संतोष दानवे संतोष मरमट राजू राज राजपूत अभिजीत पगारे सोमनाथ बोंबले पराग कुंडलवाल नंदू लबडे अंकुश दानवे जगन्नाथ दानवे सुरेश दानवे आकाश दानवे पोपटराव दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.