मंत्री अमित देशमुख अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी

लातूर, दि, १७ :-  वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे उद्या, दि. १८ आणि परवा १९ ऑक्टोबर रोजी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्याच काही भागात खरीप पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागाला वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख हे रविवार व सोमवार दोन दिवस भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना दिलासा देतील.