केंद्राकडून आवश्यक ती मदत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी राज्याच्या काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत साधला संवाद

नवी दिल्ली, 16 ऑक्‍टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संवाद साधला.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल बोललो. या पुरामुळे बाधित बंधू आणि भगिनींप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. सध्या सुरु असलेल्या बचाव आणि  मदत कार्यात केंद्राकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल”, असे पंतप्रधान म्हणाले.