परभणी जिल्ह्यात 391 रुग्णांवर उपचार सुरू, 29 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 16 :- जिल्ह्यातील 29 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6हजार 198 एवढी झाली आहे. त्यापैकी 5 हजार 554 बरे झाले तर 253 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 391 जणांवर उपचार सुरु आहेत. गुरुवार दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 84 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 768 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 391 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 377 अशी आहे. असेजिल्हा प्रशासनाने कळविले आहे.