व्हिडिओद्वारे कलाकृती सादर, सोशल मिडियाचा केला वापर.

औरंगाबाद दि. १ 

कोरोना या विषाणूमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कलाकार आज घरात आहे.कलेशी निगडित सर्व गोष्टींना देखील कोरोनामुळे स्पीडब्रेकर लागला आहे. मात्र या सर्व नकारात्मक वातावरणात ’ कला कट्टा ’ कलावंतासाठी वेगळीच सकारात्मकता घेऊन आला आहे. या लॉकडाउन काळात कलावंतासाठी वेगळ्या प्रकारचे ’ ऑनलाईन कला प्रदर्शन ’ आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कला कट्टाच्या या ऑनलाइन कला प्रदर्शनाचे भारत गणेशपुरेंकडून व्हर्च्युअल पद्धतीनेच उद्घाटन संपन्न झाले.यावेळी सर्व कलाकारांनी देखील या अनोख्या कला प्रदर्शनाला ऑनलाईन येत हजेरी लावली.


यावेळी भारत गणेशपुरेंनी कलावंताशी अनौपचारिक संवाद साधला.यावेळी ते म्हणाले ’ लॉकडाउनच्या काळात कलाकार ऑनलाईन पद्धतीने एकत्र येऊन अशाप्रकारे आपली कलात्मकता दाखवत आहेत.कलावंतासाठी हि एक मोठी संधी आहे. कलाकारांनी स्वत:ला लॉकडाउन केल्याशिवाय ते चांगली कलाकृती घडवूच शकत नाही.या कला प्रदर्शनासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.या सर्व कलाकृती सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत.महाराष्ट्रातील बीड, मुंबई , औरंगाबाद या शहरातील विविध कलावंत यात सहभागी झाले. प्रत्येक कलाकाराने व्हिडिओद्वारे आपली कलाकृती सादर केली. विदर्भ, पुणे, कोकण या भागातूनहि कला प्रदर्शनात सहभागासाठी कलावंत इच्छुक आहेत.ऑनलाईन प्रदर्शन पाहण्यासाठी आपण कला कट्टयाच्या युट्युब चॅनलला आपण भेट देऊ शकता.कला कट्टा संस्थेद्वारे विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. कलावंतांनी लॉकडाऊनमध्ये लॉक होऊ नये यासाठी हे प्रदर्शन भरवले असल्याचे कला कट्टाने सांगितले. प्रदर्शनात औरंगाबाद येथील प्रा. रवींद्र तोरवणे, प्रा. प्रवीण मुखेकर कलाशिक्षक बीड,औरंगाबादचे प्रा. रविकृष्णन, कलाशिक्षक सचिन भोरे तर मुंबई येथून कलाशिक्षक गौरी नरगले यांच्यासह इतर कलावंतांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.लॉकडाउन नंतर दोन दिवसीय प्रदर्शन हे मूळ कला कट्टा आर्ट गॅलरी इथे ही भरवण्याचा प्रयत्न असेल. आगामी काळात इतर मान्यवर प्रदर्शनाला भेट देतील.जे कलावंत या प्रदर्शनात भाग घेऊ इच्छित असतील त्यांनी ७२६४०६६२२१ या नंबरवर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *