नांदेड जिल्ह्यात 94 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

औषधोपचारानंतर 236 कोरोना बाधितांना सुट्टी

नांदेड दि. 15 :- गुरुवार 15 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 236 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले.

आजच्या एकुण 972 अहवालापैकी 832 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 792 एवढी झाली असून यातील 15 हजार 392 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 820 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात पाच जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार 14 ऑक्टोंबर रोजी बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील 40 वर्षाची एक महिला, लोहा तालुक्यात कलंबर येथील 60 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी रुग्णालयात, बिलोली तालुक्यात डोणगाव येथील 50 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर 15 ऑक्टोंबर रोजी हदगाव येथील 80 वर्षाची एका महिलेचा हदगाव कोविड केअर सेंटर येथे, समतानगर मुखेड येथील 70 वर्षीय एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 469 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 96 हजार 720,निगेटिव्ह स्वॅब- 75 हजार 819,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 792,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 392,एकूण मृत्यू संख्या- 469,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 89.77आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 324, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 820,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43.