परभणी जिल्ह्यात 446 रुग्णांवर उपचार सुरू, 37 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 15 :- जिल्ह्यातील 37 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 169 एवढी झाली आहे. त्यापैकी 5 हजार 470 बरे झाले तर 253 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 446 जणांवर उपचार सुरु आहेत.

बुधवार दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 28 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 761 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 446 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 315 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.