औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मन में है विश्वास…..’ उपक्रमाचे आयोजन

औरंगाबाद, दि.11 :- कोविड-19 या जागतिक साथरोगाच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व आरोग्य विषयक उपक्रमास सहकार्य केले आहे. नागरिकांच्या या मनोधैर्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला “मन में है विश्वास…. ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

https://www.facebook.com/AurangabadDIO/videos/3399610843596701/

आज या उपक्रमाच्या नियोजनाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी उपक्रम यशस्वीतेच्या दृष्टीने सर्व संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, तहसिलदार तेजस्विनी जाधव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी समाजात कोरोना विषयीची भीती दूर करुन कोरोनातून लवकर बरे होण्यासाठीचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी ‘ मन मे है विश्वास ’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी संबंधितांना निर्देशित केले. या कार्यक्रमात विविध धर्माचे धर्मगुरू, अधिकारी कर्मचारी , आशा वर्कर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य यंत्रणा , वकील,उद्योजक, पत्रकार, व्यावसायिक , शेतकरी,भाजीविक्रेते, यांच्यातील काही प्रातिनिधीक व्यक्तींचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.