जालना जिल्ह्यात 101 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

44 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.11 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 44 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 83 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 18 व्यक्तींचा अशा एकुण 101 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15535असुन सध्या रुग्णालयात-216 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5434 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-266 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-58806 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-83, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-101 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-9374 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-48930, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-371, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4669

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-37, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4890 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-80 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 132 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-216,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-15, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-44, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7313, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1819 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-116308, मृतांची संख्या-242

कोव्हीड हॉस्पीटल जालना येथे रोहिलागड ता. अंबड येथील 70 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 5 नागरिकांकडून 1 हजार 300 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 184 नागरीकांकडुन 12 लाख 41 हजार 394 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.