नांदेड जिल्ह्यात 130 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

नांदेड दि. 10 :- शनिवार 10 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 130 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 86 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 342 अहवालापैकी 1 हजार 166 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 300 एवढी झाली असून यातील 14 हजार 192 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 551 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 9 ऑक्टोंबर रोजी वाजेगाव नांदेड येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, शिवाजी चौक माहूर येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा, शनिवार 10 ऑक्टोंबर रोजी बाबानगर नांदेड येथील 38 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 452 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 92 हजार 216,निगेटिव्ह स्वॅब- 71 हजार 558,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 300,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 14 हजार 192,एकूण मृत्यू संख्या- 452,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.76आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-25,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 611,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 551,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 46.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.