जालना जिल्ह्यात 38 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.7 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 52 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 23 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 15 व्यक्तींचा अशा एकुण 38 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15351 असुन सध्या रुग्णालयात-211 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5308 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-231 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-55729 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-38 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8881 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-46288, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-441, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4612

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-33, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4733 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-11 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-198 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-211,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7099, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1551 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-107766, मृतांची संख्या-231

कोव्हीड हॉस्पीटल,जालना येथे आदर्श कॉलनी, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष व दीपक हॉस्पीटल, जालना येथे एन -11 हडको जि. औरंगाबाद येथील 66 वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 43 नागरिकांकडून 5 हजार 600 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 115 नागरीकांकडुन 12 लाख 29 हजार 544 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.