नांदेड जिल्ह्यात 131 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

200 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 5 :- सोमवार 5 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 131 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 115 बाधित आले.

आजच्या एकुण 798 अहवालापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 452 एवढी झाली असून यातील 13 हजार 8 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 913 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 65 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी निवघा मुदखेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे तर रविवार 4 ऑक्टोंबर रोजी दयानंद नगर नांदेड येथील 80 वर्षाची एक महिला, अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील 60 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी नांदेड तर सोमवार 5 ऑक्टोंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, कंधार येथील 65 वर्षाची एक महिला यांचा जिल्हा रुग्णांलय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 431 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 87 हजार 142,निगेटिव्ह स्वॅब- 67 हजार 517,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 131,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 452,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,एकूण मृत्यू संख्या- 431,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 8,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 913,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 610,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 65.