जालना जिल्ह्यात 48 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

62 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.4 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 62 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दांरे 31 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 17 व्यक्तींचा अशा एकुण 48 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-15210 असुन सध्या रुग्णालयात-222 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5230 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-348 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-54692 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-48 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8752 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-45,174, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-647, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4566

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4640 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-60 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-261 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-222,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 62, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6912, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1613 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1,04,924, मृतांची संख्या -227

कोव्हीड हॉस्पीटल, शेवगा ता. परतुर जि. जालना येथील 80 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 11 नागरिकांकडून 2 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 985 नागरीकांकडुन 12 लाख 10 हजार 394 रुपये एवढा दंड वसुल करण्याहत आला आहे.