औरंगाबाद जिल्ह्यात 28678 कोरोनामुक्त, 4563 रुग्णांवर उपचार सुरू

183 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 03 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 435 जणांना (मनपा 250, ग्रामीण 185) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 28678 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 183 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34193 झाली आहे. आजपर्यंत एकूण 952 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4563 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 88 आणि ग्रामीण भागात 20 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (48) पानवडोद सिल्लोड (1), वाळूज (1), भालगाव, फुलंब्री (1), मुलानी वडगाव (1), राम नगर, पैठण (1), समृद्धी महामार्ग, नायगाव (1), चित्तेगाव (1), खामगाव, वैजापूर (2), जय भवानी नगर, बजाज नगर (3), नवीन कावसान, पैठण (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (2), नरसापूर, गंगापूर (1), गंगापूर डीसीएचसी (1), लासूर, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), नेवरगाव, गंगापूर (1), अंबेलोहळ, गंगापूर (1), लोणी बु. वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), स्टेशन रोड, वैजापूर (2), पिंपळखेड, कन्नड (1), औरंगाबाद (2), फुलंब्री (4), गंगापूर (3), सिल्लोड (2), कन्नड (4), वैजापूर (2), पैठण (4)

मनपा (47) ग्लोरिया सिटी, भावसिंगपुरा (2), घाटी परिसर (1), राधास्वामी कॉलनी (1), गजानन नगर, हडको (1), न्यू विशाल नगर (3), इंदिरा नगर (1), एन दोन सिडको (1), कांचनवाडी (1), भारत नगर (1), छावणी परिसर (1), काल्डा कॉर्नर, श्रेयस नगर (1), टाऊन सेंटर, सिडको (3), गजानन कॉलनी (1), जालन नगर (2), वानखेडे नगर (1), होनाजी नगर (1), राजीव गांधी नगर (1), जय भवानी नगर (1), विश्वभारती कॉलनी (1), शिवाजी नगर (2), उल्कानगरी (1), एन पाच गुलमोहर कॉलनी (1), एन सात (2), आनंद नगर (1), न्यू हनुमान नगर (1), टिळक नगर (1), साई नगरी (1), ज्योती नगर (1), एन आठ सिडको (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), राजे संभाजी कॉलनी (1), ठाकरे नगर (2), चिकलठाणा (1), बीड बायपास (1), पीडब्ल्यूडी कॉलनी (1), नंदनवन कॉलनी (1), राजाबाजार (1), सिडको (1),

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील 60 वर्षीय पुरूष, चिकलठाणा येथील 80 वर्षीय पुरूष, शिवकृपा कॉलनीतील 65 वर्षीय स्त्री, फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील 60 वर्षीय पुरूष आणि कन्नड तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.