विवेक कल्याण रहाडे यांचे आत्महत्या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा

बनावट चिठ्ठी पोलीसांसमोर न आणता सोशल मिडीयावर, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने प्रसारीत

बीड :ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत मौजे केतुरा गावातील विदयार्थी विवेक कल्याण रहाडे यांचेआत्महत्या प्रकरणात अज्ञात आरोपीता विरुध्द गुन्हा 316/2020 कलम 4065,471,505(च),34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

३०.०९.२०२० रोजी बीड जिल्हयात बीड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे केतुरा येथील विदयार्थी विवेक कल्याण रहाडे वय १८ वर्ष याने स्वतःचे शेतात गळफास घेवुन आत्महत्या केली. त्याअनुशंगाने पो.स्टे. बीड ग्रामीण येथे अ.म.नंबर ३६/२०२० कलम १७४ CrPC प्रमाणे दाखल आहे.या घटनेचे गांभीय लक्षात घेवुन पो.स्टे.चे अधिकारी व कर्मचारी ताबडतोब घटनास्थळावर गेले व घटनास्थळ पंचनामे, इनक्वेस्ट पंचनामा केला व मयताचे अंगवारील कपड्याची त्यांचे नातेवाईका समक्ष तपासणी केली तसेच घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसर तपासला त्यावेळी काही ही मिळुन आलेले नाही. त्यानंतर प्रेताचे वैदयकीय अधिकारी सरकारी दवाखाना बीड यांनी P.M. करुण मृत्युचे कारण Death by asphyxia due to hanging असा अभिप्राय दिला आहे.

Image

सोशल मिडीयावर कोणीतरी अज्ञात इसमाने खोडसाळ पणाने मयताचे रजिस्टरमधील चिठ्ठी पोलीसांसमोर न आणता सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्याबाबत पोलीसांनी आधिक तपास केले असता असे निदर्शनास आले की, मयताच्या घरातील जप्त रजिस्टरच्या एका पानांवर असा मजकुर लिहला होता की, मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे.मला जिवनात खुप मोठ होण्याची ईच्छा आहे. मी आत्ताच निट ही मेडीकलची परीक्षा दिलेली आहे. माझा निट मध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही माझे घरच्याची मला प्रायव्हेट मध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मराठ्यांच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.. अशा आशयाची चिठ्ठी सापडली.

R.Raja ,Beed SP

त्यानंतर पोलीसांनी पुढील तपासात मयताने ज्या शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेतले त्याठिकाणावरुण त्याने लिहलेल्या उत्तर पत्रिक हस्तगत केल्या व हस्ताक्षर तज्ञाकडे हस्ताक्षराचे परीक्षण करण्यासाठी उत्तरपत्रिका व सुसाईटनोट पाठविण्यात आल्या. त्यात सुसाईट नोट चिट्ठीतील हस्ताक्षर व मयताच्या उत्तर पत्रिकेतील नैसर्गिक हस्ताक्षर जुळत नाहीत. असे प्रमाणपत्र हस्ताक्षर तज्ञांनी दिले आहे.या घटनेला वेगळे स्वरुप देण्याचे दुष्ट हेतुने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मयत वापरत असलेल्या रजिस्टर मध्ये यातील वरील नमुद मजकुर लिहुण तो मयताने लिहीला आहे असा समझ निर्माण व्हावा म्हणुन बनावट दस्ताऐवज तयार केला. तो दस्ताऐवज मयताने लिहलेला नाही हे त्याला माहीती असतांना देखील त्याने कपटीपणाने व अप्रमाणिक पणाने तो मजकुर खरा असल्याचे भासवून खोटा मजकुर सोशल मिडीयावर सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने प्रसारीत केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टशेन बीड ग्रामीण येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं ३१६/२०२० कलम ४६५,४७१, ५०५(ब), ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हींचा तपास योग्य मार्गाने करण्यात येत आहे असे आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.