नांदेड जिल्ह्यात 140 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

154 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 3 :- शनिवार 3 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 140 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 101 बाधित आले.

आजच्या एकुण 651 अहवालापैकी 501 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 199 एवढी झाली असून यातील 12 हजार 545 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 135 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण आठ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार 2 ऑक्टोंबर रोजी गवळीपुरा नांदेड येथील 27 वर्षाच्या एका महिलेचा, बजरंग नगर नांदेड येथील 68 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात येथे तर भोकर येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, वसरणी नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा तर शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी नाथनगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका महिलेचा, इंदिरानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, हडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, सोमेश कॉलनी नांदेड येथील 86 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 420 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 86 हजार 96,एकुण निगेटिव्ह स्वॅब- 65 हजार 997,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 199,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 545,एकूण मृत्यू संख्या- 420,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 391,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 135,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 33.