स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. ३ :-  हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या मराठी, तेलुगू, कन्नड अशा भिन्न भाषिकांना एकत्र आणून हैदराबाद मुक्तीचा लढा लढला. हैदराबाद संस्थानाचं भारतातलं विलिनीकरण, मराठवाडा मुक्ती संग्रामातलं यश, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या ऐतिहासिक घटनांमागे स्वामीजींची दूरदृष्टी, प्रेरणा, त्याग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वामीजींना आदरांजली वाहिली.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत स्वामीजींचं मोठं योगदान आहे. राजकारण, समाजकारणाच्या बरोबरीनं त्यांनी देशात शैक्षणिक चळवळ राबवली. अखंड भारताचे निर्माते, मराठवाड्याचे मुक्तीदाते म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र सेनानी  स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२० रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी  विधानभवन परिसरातील असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

स्वारातीम विद्यापीठामध्ये अभिवादन  

नांदेड – थोर स्वातंत्र सेनानी, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज  दि. ०३ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठ प्रांगणातील  पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या स्वागत कक्षामध्ये पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांचा प्रतिमेस कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्यासह अधिकारी/कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, श्री. शिवराम लुटे, जीतुसिंग शिलेदार,पठाण सिद्धिकी, मोहन हंबर्डे, संभाजी हंबर्डे,बालाजी घोळक, रामदास खोकले, तुकाराम हंबर्डे यांच्यासह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रम झाला.