शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली का ? नेमकं काय म्हणाले पवार,वाचा

पुणे : शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे ते बिनधास्त फिरत आहेत, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर त्याबद्दलची नेमकी माहिती दिली. ते म्हणाले मी कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. कोरोनाची लस घेतली नाही पण सिरममध्ये जाऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याचे ( R ट्रिपल BCG बूस्टर) लस घेतली आहे.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही लस घेतली आहे, असेही पवार म्हणाले. “मी कोरोनाची लस घेतल्याचे लोक म्हणतात ते खरे नाही.” शरद पवार पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटमध्ये दोनदा जाऊन आले आहेत. त्यानंतर त्यांनी कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती. त्यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.
“मी एकदा नाही तर दोन वेळा लस घेतली. मात्र जी तुम्हाला आणि लोकांना वाटते ती कोरोनाची लस नाही. तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची. मी इतकं लोकांमध्ये फिरतो..मिसळतो.प्रतिकारशक्ती वाढायला हवी म्हणून मी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतल्याचे ते म्हणाले.
पवारांच्या सीरम इन्स्टीट्युट दौऱ्याबद्दल आणखी काही शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत. भविष्यात कोरोनाची लस येण्याच्या दृष्टीने पुण्यातील सीरम इन्स्टीट्युट महत्वाची भूमीका निभावणार आहे. त्यामुळे पवारांची त्यांच्या कामाबद्दलची उत्सुकताही वाढली आहे. त्यामुळे पवार एकदा नव्हे तर दोनदा या संस्थेमध्ये दौऱ्यासाठी गेले होते.