सत्ताधाऱ्यांचे लोक, कार्यकर्त्यांकडून घेतात घरं जाळून अशी शंका; जरांगे यांनी केलं शांततेचं आवाहन….

जालना ,३० ऑक्टोबर / प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. उपोषण , मोर्चे , प्रचार सुरु असताना आता ठिकठिकाणी जाळपोळ देखील सुरु झाल्या आहेत. या जाळपोळीच्या घटनेवरती मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्त्यवं मांडलं आहे. मी समाजाला सांगितल होत की जिथं जिथं, साखळी उपोषण आहे तिथं तिथं आमरण उपोषण सुरु करा. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करतोय. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका असं आवाहन मी केलं होत . मराठा समाजाचं आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करतेय या गोस्टची मोठी मला शंका येतं आहे. राज्यात जि जाळपोळहोत आहे ती करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीत घरं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.

बीडबरोबर राज्यभरात मराठा आंदोलकांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे. काही जाळपोळींच्या घटनाही देखील घडल्या आहेत. आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांचे बंगले आणि कार्यालय यांना देखील जाळपोळीचा सामना करावा लागला आहे . त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मराठा बांधवाना सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.

जाळपोळ करू नका अन्यथा निर्णय घेणार

मराठा समाजान शांत रहावं असं आवाहन करताना मनोज जरांगे म्हटलं आहेत की, सर्वाना माझी हात जोडून विनंती आहे, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचं आहे. आपण कुणाच्याही दारात जाचचं नाही.असं जरांगे म्हटलं आहेत

लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव आणून मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे – मनोज जरांगे

आमदार आणि खासदार यांनी राजीनामे दिले तर आपली संख्या कमी होईल.तुम्ही एकजूट करा.सरकारवर दबाव टाकला पाहिजे मुंबईकडे कूच करा.त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तात्काळ शक्य होईल,असे राजीनामा सत्रावर जरांगे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

लोकप्रतिनिधींनी पक्षापासून बाजूला व्हावे म्हणजे आमदार व खासदार यांनी मुंबईला गेले पाहिजे.मराठ्यांचा ओबीसीमध्ये सामावेश करावा.यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.ज्यांनी राजीनामा दिला.त्यांना पाठिंबा आहे.पण राजीनामा देण्यापेक्षा सरकारवर दबाव टाकला तरी प्रश्न सुटतो,असे ते म्हणाले.

भावनिक होणे साहजिक आहे.पिढ्यान् पिढ्या आपल्या लेकरांच्या वाटोळे होत आहे.भावनिक होऊन चालणार नाही.तुमची माया मी नाकारणार नाही.आपल्याला न्याय घ्यायचा आहे.तुमच्या किंवा माझ्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होईल.आपले लेकर न्यायासाठी त्रासलेले आहेत.जीवाची बाजी लावून लढायला लागेल.तुम्हाला विनंती की,तुम्ही समजून घ्या.मला ही कळते पाणी प्यावे.पण माझी भावना समजून घ्या,असे जरांगे म्हणाले.

फडवणीस यांनी चर्चेला यावे..

तुम्ही म्हणतां समाजाने चर्चा केली नाही म्हणून म्हणतो चर्चेला यावे.रोज रोज फडवणीस समोर येतो.आमची इच्छा नाही चर्चा करायची.आमच्या डोक्यावर खापर फोडलं जाईल म्हणून चर्चा करायची.

जरांगे पाटील समाजाला न्याय मिळेल पण समाजाला न्याय देणारे तर तुम्हीच आहात मग पाणी का पित नाही ? या प्रश्नावर ते म्हणाले की,कुणाला तरी त्रास सहन करून जीवाची बाजी लावावी लागेल.त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही.मला समाजाचा पाठिंबा आहे.छत्रपतींचा आशिर्वाद आहे त्यामुळे मला विश्वास आहे आरक्षण मिळेल.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील ज्यांना पक्षापेक्षा पदापेक्षा जात मोठी वाटते.त्यांनी राजीनामे दिले.त्यांचे कौतुक वाटते.त्यांचे जातीचे प्रेम दिसून येते.पण राजीनामा देण्यापेक्षा त्यांनी एकजुटीने मुंबईत जावे.आमच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली पाहिजे.सरकारवर दबाव टाका आणि विशेष अधिवेशन घ्यायला लावा.आता आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही.

मनोज जरांगे यांचा वारंवार उपचार घेण्यास दिला नकार

प्रकृती खालवण्याची शक्यता..

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे.उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे.त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे.आज दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी दोनदा वैद्यकीय पथक तपासणी व उपचार देण्यासाठी दाखल झाले.पथकाने विनंती केली असता,तुम्ही खाली व्हा,असं म्हणत जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.

उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे..

मराठा समाजाला आरक्षण मिळावे.या मागणीसाठी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.वैद्यकीय पथक प्रमुख डॉ शितल शिनगारे म्हणाल्या की,उपोषणामुळे त्यांच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.डॉक्टर हे मनोज जरांगे यांच्याशी दर २ ते ३ तासांनी बोलत आहेत.

वैद्यकीय पथक हे २४ तास उपोषण ठिकाणी उपस्थित असतात.मात्र प्रत्येक वेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी व उपचार करण्यास नकार दिला आहे.उपोषणाला बसल्याने किडनी आणि मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो,असे त्यांनी सांगितले.त्यांची साखरेची पातळी देखील कमी होऊ शकते आणि त्यांना इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते,असे त्यांनी सांगितले.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र असे आरक्षण मिळाल्याशिवाय उपचार घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.आरक्षण हाच माझा उपचार यावर ते ठाम असून ते उपचार घेण्या नकार देत आहेत.दरम्यान,आज दुपारी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी स्वतःची काळजी घेत उपचार घेण्याचे आवाहन केले.