औरंगाबाद जिल्ह्यात 193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू

जिल्ह्यात 27814 कोरोनामुक्त, 5086 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 1 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 314 जणांना (मनपा 125, ग्रामीण 189) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 27814 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33841 झाली आहे. आजपर्यंत एकूण 941 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5086 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 68 आणि ग्रामीण भागात 18 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या) आहे.

मनपा (81) एनआर एच हॉस्टेल (1), बीड बाय पास (3), सातारा परिसर (2), उल्कानगरी (2), एन 1 सिडको (1),श्रीकृष्ण नगर, सुंदरवाडी (1), अलोक नगर, सातारा परिसर (1),जाधववाडी (1), मयुर पार्क , जाधववाडी (1), हनुमान नगर (1),ठाकरे नगर, सिडको (1),एन 12 हडको (1), रहेमानिया कॉलनी (1),चिकलठाणा नवीन घाटी (1), संतोषी मातानगर , मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर (2),शिवकृपा रेसीडेन्सी, बीड बायपास (1), पद्मपुरा (1), एन 7 आयोध्या नगर (2), बजरंग कॉलनी (1), समर्थ नगर (7), मिलिट्री हॉस्पिटल (1),सुदर्शन नगर हडको (1),एसबीएच कॉलनी (1), दिलीप नगर (1), सिडको (1), टिळक नगर (1), यादव नगर हडको (1), गोवर्धन कॉम्पलेक्स, खाराकुआ (1), सारासिध्दी (1), एन 3 सिडको (1), कांकरिया रेसीडेन्सी, व्यकटेश नगर (1),पद्मपुरा, सोनारवाडी (1), भावसिंगपुरा (2), एन 9 यशवंत नगर (1), गुरु प्रसाद नगर (1), कमलनयन हॉस्पिटल बीड बाय पास (1), आविष्कार कॉलनी (1), बजाज नगर (1), नवजीवन कॉलनी (1), सिडको, हायकोर्ट (2), धूत हॉस्पिटल (1), एन बारा हडको (1), म्हाडा बाबा पेट्रोल पंप (2), कांचनवाडी (2), सन्मित्र कॉलनी (1), शहानुरवाडी (1), साईनगर एन सहा (1), घाटी परिसर (1), उस्मानपुरा (1), देवानगरी (1), हर्सूल (1), हडको (1), संभाजी कॉलनी एन सहा सिडको (1), राजनगर (1), वानखेडे नगर (1), एन सहा सिडको (5), जवाहर कॉलनी (1), गारखेडा (1), पिसादेवी (1), अन्य (1)

ग्रामीण (44) कृष्णपूर, बिडकीन (1), वाकळा, वैजापूर (1), लोहगड नांद्रा, फुलंब्री (1), वडाळी,कन्नड (2), वैजापूर (8), लिंबे जळगाव (1), रामनगर, कन्नड (2), सरस्वती कॉलनी (1), शिरोडी, कन्नड (1), लाडगाव (1), पिंप्रिराजा (1), शिवाजी रोड वैजापूर (1), लासूर स्टेशन (1),आंबेडकर चौक, बजाज नगर (1), दिवशी, गंगापूर (1), भादगाव रोड, पाचोरा (1), दत्त नगर, वाळूज (1), वाळूज पोलीस स्टेशन परिसर (1), औरंगाबाद (2), फुलंब्री (2), गंगापूर (3), कन्नड (3), खुलताबाद (1), पैठण (3), सोयगाव (3)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत लहूगड नांद्रा येथील 67 वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात चेलिपुऱ्यातील 65 वर्षीय पुरुष ,एन सात सिडकोतील 78 वर्षीय पुरुष, मोतीवाला नगरातील 63 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.