शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे आंदोलन तुर्तास स्थगित,परीक्षेचे वेळापत्रक लवकरच

अजितदादा पवार यांच्या समवेतची बैठक महत्वपूर्ण ठरली
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे १५ दिवसात कार्यवाहीचे आश्वासन
मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑक्टोबरपासून आंदोलन

औरंगाबाद, दि.१ : गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील १४ विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिका-यांनी सुरु केलेले आंदोलन गुरुवारी सायंकाळी तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत कृती समितीच्या पदाधिका-यांची गुरूवारी बैठक झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली. 

२९ सप्टेंबर व ०१ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग आश्वासित प्रगती योजनेच्या अंतर्गत दहा, वीस, तीस वर्षाच्या सेवेनंतरच्या तीन लाभांची योजना हया प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी दि.२४ सप्टेंबर २०२० पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन कर्मचा-यांचे राज्यव्यापी लेखणी/अवजार व काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येते आहे.   

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठाय सेवक संयुक्त कृती समितीने उपरोक्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी लेखणी/ अवजार बंद सह ‘ठिय्या आंदोलन‘ दि.२४ सप्टेंबर २०२० पासून तर दि.०१ ऑक्टोबर २०२० पासून काम बंद आंदोलन पुकारले होते. आपणाशी दि.२८/०९/२०२० रोजी कृती समितीच्या प्रतिनिधीसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे आलेल्या बैठकीत  ‘व्हीडीओ कॉन्फरन्स‘ झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने व कृती समितीचे समन्वयक रमेश डोंगर शिंदे  यांच्या समवेत दि.२९, ३० सप्टेंबर व दि ०१ ऑक्टोबर २०२० रोजी भ्रमणध्वीनवरुन झालेल्या चर्चेत आपण नमूद दाहा मागण्यापैकी पहिल्या चार मागण्यासह अन्य दोन मागण्याची पूर्तता त्वरित करण्याचे आश्वासन दिले असून उरवलीत तीन मधील इतिवृत्तात नमूद तीन मागण्या त्वरित पूर्ण करणार असल्याची ग्वाही व आश्वासन वारंवार दिले आहे तसेच ‘टिटृ‘ ही समाज माध्यमांवर केले आहे.

आपण स्वत: वैद्यकीय उपचार घेत असल्याने तसेच मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या विद्यापीठ शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याने आपणास या विषयांच्या सोडवणुकीसाठी आपल्या मागणीनुसार आपल्या विनंतीचा मान ठेवून सेवक संयुक्त कृती समिती आजपासून सुरु झालेल्े ‘काम बंद‘ आंदोलन दिनांक १९ ऑक्टोबर २०२० सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात येईल. व कृती समितीचे सर्व सभासद त्या त्या महाविद्यालये व विद्यापीठ ‘बेमुदत काम बंद आंदोलन‘ पुन्हा तीव्रतेने सुरु करतील, याची नोंद घ्यावी .

कृती समितीने सुचविल्याप्रमाणे दुरुस्त करण्याबाबत स्वतंत्रपणे कळविले असून आपण त्याप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश घावेत,ही सांगण्यात आले. मागणीतील अनुक्रम एक ते चार हया मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन स्थगित केलेल्या परिस्थितीत दि.१९ सप्टेंबर २०२० पासून पुनश्च सुरु करण्यात येईल, असे ही कृती समितीने म्हटले आहे.  आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी केली. यावेळी अध्यक्ष पर्वत कासुरे, सचिव प्रकाश आकडे, ऑफिसर फोरमचे डॉ दिगंबर नेटके, राज्य सदस्य अनिल खामगांवकर उपस्थित होते.
 कुलगुरू यांची भूमिका निर्णायक ठरली 
दरम्यान, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलन काळात माननीय मंत्री महोदय यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू यांची ऑनलाइन बैठक झाली. त्यांचा संप मिटला शिवाय परीक्षा घेणे अशक्य आहे, असे कुलगूरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्टपणे घेतली. तसेच कर्मचाऱ्यांनीही समन्वयाची भूमिका घ्यावी असे आवाहन कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केले होते. मंत्री व कृती समिती या दोघांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
कुलसचिवासंह प्राध्यापकांची भेट
 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास गुरुवारी (दि. एक) कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच एम आयएमचे जेष्ठ नेते डॉ. गफार कादरी, राज्य विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष डॉ. कुणाल खरात, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे नेते डॉ. शंकर अंभोरे, बामुक्टोचे नेते डॉ. उमाकांत राठोड, माब्टाचे नेते डॉ. भगवानसिंग ढोबाळ, कोहिनूर  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मजहर खान आदींनी भेट दिली.