जिल्ह्यात 52 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

73 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.1 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 73 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 35 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 17 व्यक्तींचा अशा एकुण 52 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-14938 असुन सध्या रुग्णालयात-266 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5147, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-131 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-53366 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-52 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8511 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-44180, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-556, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4421

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4551 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-70 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-299 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-266,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 73, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-6664, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1626 (29 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-95170, मृतांची संख्या -221कोव्हीड हॉस्पीटल,जालना येथे जवाहर कॉलनी अंबड जि. जालना येथील 77 वर्षीय पुरुष, पिंप्री ता. सेलु जि. परभणी येथील 90 वर्षीय पुरुष व मोरंडी मोहल्ला जुना जालना येथील येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकुण तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 74 नागरिकांकडून 8 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 5 हजार 853 नागरीकांकडुन 11 लाख 88 हजार 644 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.