मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दंड थोपटण्याची तयारी सुरू केली

जालना ,२७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मराठा आरक्षणासाठी 17 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दंड थोपटण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

मराठा समाज हा मागास आहे वेळोवळी कायद्याने सिध्द झाले तरी, सरकारने सांगावे आम्हाला मराठा समाज मागास आहे हे.कशात सिध्द करावे ,मागास सिध्द करण्यासाठी आम्ही तयार आहे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महिना माघितला तो दिला समितीचे काम काय सुरू आहे आम्हाला माहीत नाही आधी हैदराबादला ही समिती गेली आणि आता मुंबईत जाऊन बसली, या संमतीची अंबड किंवा छत्रपती संभाजीनगरला एक बैठक घ्यावी अशी विनंती ती सुद्धा अजून मान्य केली नाही.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुराव्यांची गरज नाही,सरकार उगीचच आम्हाला डीवचत आहे.आरक्षण देण्याची इच्छाशक्ती ठेवा., जर सरकार मिळाल्या नोंदीनुसार आरक्षण देणार असेल तर ते आरक्षण आम्हाला ही तहशिल कार्यालयातून घेता येते तुमच्याकडे आरक्षण मागायला यायची गरज आहे का,? दुसऱ्या पोट जाती घेतल्या जाते मग मराठा समाज का नाही, नोंदी नाही सापडले तर मग आरक्षण देणार नाही का ?वेगळा प्रवर्गातून आम्ही आरक्षण घ्यायला तयार आहे तो प्रवर्ग 50 टक्क्यांच्या आत वेगळा प्रवर्ग करून अगोदर मराठा समाजाला 50 टक्के च्या आत घेऊन आरक्षण द्या त्यानंतर आरक्षण मर्यादा वाढवा,असेही जरांगे पाटील म्हणाले,
मराठा समाजात आणि ओबीसी समाजात गैरसमज नको, आहे गैरसमज पसविणारे थोडेच लोक आहे ज्यांना दोन्ही समाजाचे हित बघावत नाही, मराठा समाजातील सगळ्यांना ओबीसी आत घेतले ओबीसी आरक्षण टक्का घटेल असे गैरसमज पसरविले जाते परंतु कुणबी प्रवर्गात येण्यासाठी राहिला मराठा समाज असा किती हे समजून घेत नाही,.
ठराविक लोकांनी गैरसमज पसरविला आहे त्यांच्यात आमचेपण काही लोक आहे, औ विदर्भ, खानदेश, कोकण, पुर्ण तर पश्चिम महाराष्ट्र अर्धा आधीच आहे फक्त मराठवाड़ा व महाराष्ट्रतील काही लोक राहीले आहे त्यांना गोरगरीब समाजाला सामिल केल्याने फारसा कोणालाही फरक पडणार नाही, असे ही जरांगे पाटील म्हणाले , सरकारने दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हणाले अजुन घेतले नही, सरकारचे दोन दिवस किती मोठे हे समजत नहीं,
मराठा समाजाशी संवाद करण्यासाठी तसेच समाजाला शांत करण्यासाठी 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर पर्यत समाजाच्या गाठीभेटी घेणार,राज्याचा दौरा करणार, दौऱ्याची सुरुवात अंतरवाली सराटी व. जालना जिल्ह्यातून करुन
दौरा हा शांततेचं आवाहन करण्यासाठी,समाजाचे आशीर्वाद घेण्यासाठी फक्त गाठी-भेटी घेण्यासाठी आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी दौरा असेल .
समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमची भावना व्यक्त करण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी, मराठा समाज जागृत करण्यासाठी 14 आँक्टोंबरला कार्यक्रम आयोजित करण्यात आला,
14ऑक्टोबरच्या कार्यक्रमासाठी 100 एकर जमीन तयार ठेवली आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त मराठा समाजाशी संवाद साधणार याआधी आमच्या आंदोलनाला विनाकारण गालबोट लावलं,आम्हाला मारहाण केली,आम्ही शांतपणे संवाद साधण्यासाठी 14 तारखेला हा कार्यक्रम घेत आहे,या कार्यक्रमात पूर्णपणे शांतता राहील,कुणाच्या पायाखाली मुंगीही मरणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
गायकवाड कमिटी यांच्या अहवालात मराठा आणि कुणबी एकच आहेत पुरावे सापडले नाही हे सरकारचे कारण ऐकणार नाही.पुरावे जास्त सापडले नाही म्हणून मराठयांना आरक्षण नाही असा कोणता कायदा आमलात आहे.याआधी कोणत्या समाजाच्या नोंदी बघून त्या समाजाला आरक्षण दिलं.सध्या सरकारला यावर काही बोलणार नाही,सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांना 14 तारखेला उत्तर देऊ
विजय वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार काहीही होणार नाही,सरकारला सर्व बाजू ग्राहय धराव्या लागतील,सर्व समाज मराठ्यांच्या पाठीशी असून ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही, विजय वडेट्टीवार जो विरोध मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांच्या विरुद्ध आपली भुमिका 14 आँक्टोंबर रोजी जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.