नांदेड जिल्ह्यात 264 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

238 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 30:- बुधवार 30 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 238 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 264 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 81 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 183 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 254 अहवालापैकी 974 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 706 एवढी झाली असून यातील 11 हजार 953 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 255 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 56 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील नरसी येथील 72 वर्षाचा एक पुरुष, वडपुरा नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर हडको नांदेड येथील 69 वर्षाचा एक पुरुष, अशोकनगर नांदेड येथील 67 वर्षाची एक महिला यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 30 सप्टेंबर रोजी मुखेड येथील 65 वर्षाची एक महिला मुखेड कोवीड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 403 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 83 हजार 322,एकुण निगेटिव्ह स्वॅब- 64 हजार 46,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 706,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 953,एकूण मृत्यू संख्या- 403,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के.आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 80,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 255,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 56.कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.