परभणी जिल्ह्यात 591 रुग्णांवर उपचार सुरू, 82 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 30 :- जिल्ह्यातील 82 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 316 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 हजार 501 बरे झाले तर 224 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 591 जणांवर उपचार सुरु आहेत. मंगळवार दि.29 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 106 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 723 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 591 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 132 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.